Sant Gadge Baba Suvichar in Marathi – संत गाडगेबाबा यांचे सुविचार मित्रांनो आपण या लेखांमध्ये संत गाडगेबाबा यांच्यावर आधारित काय कोट्स आपण या लेखाच्या माध्यमातून बघणार आहोत.
संत गाडगेबाबा हे आधुनिक महाराष्ट्राचे महान संत आणि तसेच समाज सुधारक म्हणून त्यांना एक नवीन ओळख नावाने जायचे संत गाडगेबाबा हे महाराष्ट्रातील एक क्रांतिकारी तसेच संत आणि समाज सुधारक तसेच ते बरेचसे वेगवेगळे प्रकारचे काम केले आहे.
आपल्या जीवनात त्यांनी आपल्या अनेक गावांमध्ये भटकंती देखील निर्माण केली. तसेच संत गाडगे महाराजांनी शिक्षण आणि स्वच्छता या विषयावर त्यांनी एक विशेष प्रकारे रुची देखील निर्माण केली होती.
संत गाडगे महाराज यांच्या जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती या जिल्ह्यामध्ये परीट शेणगाव येथे झाला त्यांना जन्म नावाने एक वेगळी ओळख त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती डेबू या नावाने त्यांना ओळखले जायचे तसेच त्यांच्या आई आणि वडिलांचे नाव झिगार राजी सखुबाई.
संत गाडगे महाराज यांच्या वडिलांना खूप प्रमाणात दारू पिण्याची सवय होती व त्यामुळे त्यांचे स्वास्थ खूप खराब असायचे आणि त्यांची घरची परिस्थिती पण खूप जास्त प्रमाणात खराब होती.
मित्रांनो तुम्ही या लेखांमध्ये संत गाडगे महाराज यांच्यावर आधारित जर काही कोट्स बघत असाल तर अगदी योग्य ठिकाणी आलेले आहात. संत गाडगे महाराजांना त्यांच्या कारकीर्दीमध्ये असे अनेक चांगले देखील पुरस्कार त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
तसेच त्यांनी संत गाडगे महाराज स्वच्छता या अभियानाची त्यांनी 2001 ते 2000 मध्ये त्यांनी सुरुवात केली होती. मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला या सर्व कोट्स नक्की आवडले असतील.
तसेच तुम्हाला या कोट्स बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जरूर विचारू शकतात.
Sant Gadge Baba Suvichar in Marathi
माय बाबांनो, घरीदारी व गावात नेहमी स्वच्छता ठेवा.
मुला-मुलींना शिकवा. अंध, अपंग, अनाथांना यथाशक्ती अन्न, वस्त्र दान करा..!!
Maay babano, gharidari va gavat nehmi swachata theva.
Mula – mulina shikava. Andha, apang, anathana yathashakti anna, vastra dan kara..!!
गाय सुखी, तर शेतकरी सुखी आणि शेतकरी सुखी,
तर जग सुखी. म्हणूनच गोपालन,
पशुपालन प्रेमाने करा आणि सर्व प्राणिमात्रांवर दया करा.
हाच आजचा धर्म आहे..!!
Gay sukhi, tar shetkari sukhi aani shekatri sukhi,
tar hag sukhi, mhanunch golpan,
pasupalan premane kara aani sarva parnimatranvar daya kara.
Hach aajaca dharma aahe..!!
Sant Gadge Baba Suvichar in Marathi 2022
माणसाचे खरोखर देव कोणी असतील तर ते आहेत “आईबाप.”
आई बापाची सेवा करा..!!
Mansache kharokhar dev koni astil tar te aahet “aaibaap”.
Aai bapachi seva kara..!!
हवा आहे, लाल आहे, हिरवी आहे, पिवळी आहे,
ते समजत नाही आणि त्याचे ठिकाण नाही. असाच परमेश्वर आहे.
हे जे तिर्थात देव बसलेले आहेत ना, हे पोट भरण्याचे देव आहेत..!!
Hava aahe, laal aahe, hiravi aahe, pivali aahe,
te samjat nahi aani tyache thikan nahi. Asach Parmeshwar aahe
he je tirthat dev baslele aahet na, he pot bharnyche dev aahet..!!
Sant Gadge Baba Quotes in Marathi
दान घेण्यासाठी हात पसरू नका.
दान देण्यासाठी हात पसरा..!!
Dan ghenyasathi hat pasaru naka.
Dan denyasathi hat pasara.!!
गणपती बसवणे देवाची भक्ती नाही. जेव्हा तुम्ही गणपतीला आणता,
बँड लावता, भजन लावता आणि वाजवत वाजवत आणता,
आणून सिंहासनावर बसवता अन् त्याची पूजा करता. निवद,
मोदक, आरत्या आणि शेवटच्या दिवशी उठवता. ज्याची एवढी भक्ती केली,
एवढी शोभा केली, ज्याच्या आरत्या केल्या. त्याला पाण्यात बुडवून मारता!
तुमच्यावर कधी खटला भरला तर फौजदारी होते.
ही देवाची भक्ती नाही. देवाची भक्ती म्हणजे भजन…!!
Ganpati basavne devachi bhakti nahi. Jevha tumhi ganpatila anata,
brand lavata, bhajan lavata aani vajavat vajavat anata,
anun shihasanavar basvta ann tyachi pooja karta. Nivad,
modak, aartya aani shevtchya divashi uthavata. Jyachi evdhi bhakti keli,
evdhi shobha keli, jyachya aartya kelya. Tyala panyat budavun marata !
tumchyavar kadi khatala bharala tar faujdari hote.
Hi devachi bhakti nahi. Devachi bhakti mhanje bhajan..!!
Sant Gadge Baba Status in Marathi
दुःखाचे डोंगर चढल्या शिवाय
सुखाचे किरण दिसत नाहीत..!!
Dukhache dongar chadhalya shivaay
sukhache kiran dist nahit..!!
जो वेळेवर विजय मिळवतो,
तो जगावरही जय मिळतो..!!
Jo velevar vijay milavato,
to jagavarhi jay milato.!!
Best Sant Gadge Baba Suvichar in Marathi
दगडधोंड्यांची पूजा करण्यात वेळ
आणि शक्ती वाया घालवू नका..!!
Dagddhondyanchi pooja karnyat vela
ani shakti vaya ghalvu naka..!!
विद्या शिका आणि गरिबाला विद्यासाठी मदत करा.
गरीबाच्या मुलाला कपडे द्या. टोपी द्या. पाटी द्या. कोरी वही द्या.
आपल्या पोराला विलायतेला पाठवायची इच्छा
करता अन् गरिबांच्या मुलाला एक-दोन
आण्याची वही देण्याची आपल्यात बुद्धी नाही तर आपण माणसं नाही..!!
Vidya shika aani garibala vidyasathi madat kara.
Garibachya mulala kapade dya. Topi dya. Pati dya.
Kori vahi dya. Aaplya porila vilayatela pathavyachi echha
karata an garibanchya mulala ek don
ananyachi vahi denyachi aaplya budhyadhi nahi tar aapan mansa nahi.!!
Sant Gadge Baba Quotes in Marathi 2022
तिर्थात देव नाही, पैशाचा नास आहे. जे तीर्थाला जातात,
त्यांना पैशाचा नास करण्यातच तिर्थ आहे..!!
Tirthat dev nahi, paisacha nas aahe. Je tirthala jatat,
tyana paishacha nas karnyatch tirtha aahe..!!
दिवाळीला टोपलं भर लाडू केले. घरच्या पोराला खूप खाऊ घाला.
पण दोन पोरं गरिबाचे येऊन उभे राहिले,
तर त्यांना दोन लहान, दोघाला दोन लाडू द्या..!!
Divaliala topala bhar ladu kele. Gharchya porala khup khu ghala.
Pan don pora garibache yeun ubhe rahile,
tar tyana don lahn, doghala don ladu dya..!!
Sant Gadge Baba Status in Marathi 2022
देवळात देव नाही. देव कुठे आहे? या जगात देव आहे.
जगाची सेवा करा. गरिबांवर दया करा..!!
Devlat dev nahi. Dev kuthe aahe ? ya jagat dev aahe.
Jagachi seva kara garibanvar daya kara..!!
आमचे भोळवट लोक, एखाद्याने गावात घर बांधलं, तर दोघं-तिघ म्हणतात,
”लेका त्याले देवानं दिल.” तुम्ही उन्हा पावसात मेले, तरी देव घर देत नाही.
मरा खुशाल. घर बांधील माणूस आणि घर गमावेल माणूसच..!!
Aamche bholvat lok, ekhadyane gavat ghar bandhala tar dogha tigha mhantat,
“leka tyale devana dila.” Tumhi unhat pavasat mele, tari dev ghar det nahi.
Mara Khushal ghar bandhil manus aani ghar gamavel manusach..!!
ज्या साली लढाई झाली त्या साली एक एक आगबोट 50-50 कोटी रुपयांची पार तळाला गेली.
अशा किती आगबोटी बुडाल्या. सत्यनारायण करणाऱ्या महाराजाला म्हणावं,
अडीच रुपये घेऊन कशाला एवढी बडबड करता? अडीच लाख रुपये घ्या,
अडीच कोटी रुपये घ्या. समुद्राच्या किनाऱ्यावर एक सत्यनारायण करा
अन् एक आगबोट वर आणा. हे त्यांना जमणार नाही..!!
Jya Sali ladhai jhali tya Sali ek ek agbot 50-50 kpti rupayanchi paar talala.geli
Ashi kiti agboti budalya satyanaryan karnarya maharajala mhanava,
adich rupaye ghya. Samrudryachya kinaryavar ek
satyanaryan karan an ek agbot var ana. He tyana jamnar nahi..!!
New Sant Gadge Baba Suvichar in Marathi
अनेक जण म्हणतात, “पगार पुरत नाही.”
पगार सरतचं नाही, असे म्हटले पाहिजे.
ज्या घरात नवरा-बायको बुद्धिमान, अक्कलवान असतील,
तिथे पगार सरत नाही. शिल्लक पेटीत टाकली पाहिजे..!!
Anek jan mhanatat,”pagar puart nahi.”
Pagar sartach nahi, ase mhantale pahije.
Jya Gharat Navara-bayko buddhiman, akkalvan astil,
tithe pagar sarat nahi. Shillak petit takali pahije..!!
कुत्री आपल्या पिल्लाला पाजते. चिमणी आपल्या पोराले चारा नेते.
मुक्या जनावरांनं केलं ना, मग माणसांनं माणसाच्या जन्मात येऊन काय करावं?
परोपकार कराल, तरच हा माणूस जन्म आहे. काही तरी करा..!!
Kutari aaplya pillala pajate. Chimani aaplya porale chara nete.
mukya janavrana kela na, mag manzana mansachya jnmat yeun kay karava ?
paropkar karal, tarch ha manus jnma aahe. Kahi tari kara..!!
Best Sant Gadge Baba Quotes in Marathi
ज्या दारून करोडपतीचा खाना खराबा केला, राजपुत्र मारले,
राजवाडे ओसाड पडले, त्या दारूच्या सावलीत उभं राहू नका.
जे दारू पितील, त्यांचा खाना खराबा झाल्याशिवाय राहणार नाही..!!
Jya darun carodpaticha khana kharab kela, rajputra marale,
rajvade osad padale, tya daruchya savalit ubha rahu naka..
je daru pitil, tyancha khana kharaba jhalyashivay rahnaar nahi..!!
सुरुवात कशी झाली, यावर बऱ्याच
घटनांचा शेवट अवलंबून असतो..!
Suruvat kashi jhali, yavar barych
ghatnancha shevat avlambun asto.!!
एका घरात दहा माणसे आहेत व घरात पैशाची तिजोरी आहे.
त्या तिजोरीची किल्ली दहा माणसाजवळ राहत नाही,
तर ती एकाच माणसाजवळ राहते. तसेच ब्रह्मांड हे एक मोठे घर आहे.
त्याची किल्ली मालकाच्या हाती आहे. तोच आशीर्वाद देऊ शकतो.
देवाशिवाय दुसरा कोणी आशीर्वाद देईल, तर ती लबाडी आहे..!!
Eka Gharat daha manse aahet va Gharat paishachi tijori aahe
tya tijorichi killi daha manasajaval Rahat nahi,
tar ti ekach mansajaval rahate tasech brahmand he ek mothe gar aahe.
Tyachi killi malkachya hati aahe. Toch aashirwad deu shakato.
Devashivay dusara koni aashirwad deil, tar ti labali aahe..!!
Best Sant Gadge Baba Status in Marathi
बायांनो, नवरा तीर्थाला जाईल, जाऊ द्या. नवऱ्याचा देव डोंगरात असेल.
पण तुमचा देव घरात आहे. आपल्या नवऱ्याची सेवा करा. दररोज नवऱ्याच्या पाया पडा.
नवऱ्याच्या गळ्यात फुलांचा हार घाला. नवऱ्यापुढं अगरबत्ती लावा..!!
Bayano, Navara titharla jail, jau dya. Navryacha dev dongarat asel.
Pan tumcha dev Gharat aahe. Aapalya navryachi seva kara. Daroj navryachya paya pada.
Navryachya galyat pholancha har ghala. Navryapudhe agarbati lava..!!
ज्या घरात देवाचं भजन असेल,
त्या घराच्या दरवाज्यावर परमेश्वर राखण आहे.
ज्या घरात निंदा असतील, फुकट गप्पा असतील, कमी-जास्त गोष्टी असतील,
त्या घराच्या दरवाजावर यमराज आहे..!!
Jya Gharat devancha bhajan asel,
tya gharachya darvajyavar Parmeshwar rakhan aahe.
jya Gharat ninda asti phukat gappa astil, kami jast gosti astil,
tya gharachya darvajavar yamraj aahe..!!
Sant Gadge Baba Suvichar in Marathi SMS
देव देवळात नाही. देऊळ तयार झालं, मूर्ती आणावी लागते.
मूर्ती विकत भेटते. देव विकत भेटतो का?
मेथीची भाजी आहे की कादे-बटाटे आहेत?
देव विकत भेटतो हेही समजत नाही ज्या माणसाला, तो माणूसचं कसा..!!
Dev devlat nahi.deul tayar jhala, murti anavi lagate.
Murti vikat bhetate dev vikat bhetato ka ?
methichi bhaji aahe ki kande batate aahet ?
dev vikat bhetato hehi samajat nahi jya mansala to manusacha kasa..!!
मोठ्या मोठ्या घरी भांडे घासणारी बाई आहे. चारी बाजूनं लुगडं फाटलेलं.
दोन लेकरं जमिनीवर टाकते आणि मोठ्या भांड्याच्या ढिग उचलते.
तिची दया येऊ द्या. तिला दिवस असतील आणि ती दरिद्री असेल,
तर ती बाळंतपण कसं करेल? आपण तिला मदत करा. गहू नका देऊ,
ज्वारीचं पीठ द्या. तूप नका देऊ, तेल द्या. नवं लूगडं नका देऊ, जूनच लूगडं द्या..!!
Mothya mothya ghari bhande ghasnari baai ahe. Chari bajuna lugand fatlela.
Don lekara jiminivar takate aani mothya bhandyanchya dig uchalte.
Tichi dya yeu dya. Tila divas astil aani ti daridari asel, tar ti balvantpana kas karel ?
aapan tila madat kara. Gahu naka deu, jyaricha pith dya.
Tup naka deu, tel dya. Nav lugad naka deu, junch lugada dya..!!
New Sant Gadge Baba Quotes in Marathi
शाळेहून थोर मंदिर नाही. उदार देणगी शाळेला द्या.
भक्तीचा प्रसार नाही श्रेयस्कर, शिक्षण प्रसार सर्वश्रेष्ठ..!!
Shalehun thor mandir nahi udar denagi shalela dya.
bhakticha prasar nahi shreyskar, shikshan prasar sarvashestha..!!
देवासाठी पैसा खर्च करू नका. तोच पैसा शिक्षणाला द्या.
मंदिराची भर करू नका. जो विद्यार्थी हुशार आहे, तो पैसा त्याला द्या.
धर्मकृत्य करण्यासाठी नाही, विद्या घेण्यासाठी पैसा खर्च करा..!!
Devasathi paisa kharcha karu naka. Toch paisa shikshana dya.
Mandirachi bhar karu naka jo Vidyarthi hushar aahe, to paisa tyala dya.
Dharmakurtya karnaysathi nahi, vidya ghenyasathi paisa kharch kara..!!
New Sant Gadge Baba Status in Marathi
तुमच्या देवाचा देवळा पूरता तरी उजेड पडतो का? नाही. मग दिवा विझला,
मंडळी दर्शनाला आली, बापूराव दिवा लावा. मग देव कोणी दाखवला?
दिव्यानं…! दिवा मोठा की देव मोठा? दिवा…!!
Tumchya devachan devala purta tari ujed padato ka ?
Nahi mag vijhala, mandali darshala ali, bapurao dila lava.
Mag dev koni dakhavala ? divnyana diva motha ki dev motha ? diva…!!
कोणी तुम्हाला जात विचारली, तु कोण? तर म्हणावं मी माणूस.
माणसाला जाती दोनच आहेत. बाई आणि पुरुष.
या दोनच जाती आहेत. तिसरी जातच नाही..!!
Koni tumhala jaat vicharali, tu kon ? tar mhanava mi manus.
Mansala jati donch aahet baai aani purusha.
Ya donch jati aahet. Tisari jatch nahi..!!
Sant Gadge Baba Suvichar in Marathi Images
सरकारने दारूबद्दल उपदेशच करायला नको.
पण मुलंच पोलीस झाले पाहिजे. बाप दारू पिऊन सापडला,
असा बडवा की बापाच्या बापाने पाहिलं नसेल, असा थंडा करा..!!
Sarkarne darubaddl updeshacha karayala nako.
Pan mulancha police jhale pahije. Baap daru piun sapdala,
asa badva ki bapachya pahila nasel, asa Thanda kara.!!
माणसाचे धन तिजोरी नाही, सोनं नाही, हिरे नाही, मोटर नाही.
माणसाचं धन कीर्ती आहे. चार महिने बरसात परमात्मा देते. मग जमीन पिकते.
चार महिने बरसात नाही पडली, तर जमीन पिकेल का? हजारो करोडो लोक मरतील,
देवाला आपण फुलं वाहतो. फुलं कोणी पैदा केली? आपल्या आजाने की पंजाने?
देवाने केली. मग त्याचीच फुलं, त्याचीच बरसात, आपण त्याचं त्यालाच देतो..!!
Mansache dhan tijori nahi, sona nahi, hiro nahi, motor nahi.
Mansacha dhan kirti aahe char mahine barsat parmatna dete. mag jamin pikate.
char mahine barsat nahi padali, tar jamin pikel ka ? hajaro karodo lok martil,
devala apan phola vahato. Phola koni paida keli ? aaplya ajane ki panjane ?
devane keli. Mg tyachich phola, tyachich barsat, apan tyacha tyalach deto..!!
डॉक्टर आंबेडकर साहेब यांच्या वडिलांना सद्बुद्धी सुचली
आणि आंबेडकर साहेबाला शाळेत घातलं. आंबेडकर साहेबांन काही
लहान-सहान कमाई नाही केली. हिंदुस्तानची घटना केली, घटना!
अन् तेच शाळेत गेले नसते अन् शिकले नसते तर
झाडू मारणंच त्यांच्या कर्मात होतं. विद्या मोठं धन आहे..!!
Doctor Ambedkar saheb yanchya vadilana saddhidhi suchali
aani Ambedkar sahebala shalet ghatala. Ambedkar saheban kahi
lahan sahan kamai nahi keli. Hindustanchi ghatana keli,
ghatana an tech shalet gele naste an shikale naste tar
jhadu marnach tyanchya karmat hota. Vidya moth adhan aahe..!!
मारवाडी, गुजराती, ब्राह्मण हे लोक रोज तुपातला शिरा का खातात?
कारण त्यांच्या घरी जमा खर्च आहे.
उत्पन्न किती अन् खर्च किती, हे त्यांना माहीत आहे.
आमच्या मराठ्याला, तेल्या, माळ्यां, न्हाव्या, धोब्याला जमाखर्च समजतच नाही.
जानेवारीत मजा करा आणि फेब्रुवारीत बोंबलत बसा.
काटकसर पाहिजे. घरी जमाखर्च पाहिजे..!!
Marvadi, Gujrati, brahman he lok roj tupatala shira ka khatat ?
karan tyanchya gari jama kharcha aahe.
Utpana kiti an kharch kiti, he tyana mahit aahe.
Amchya marathyala, telya, malya. nhavya, dhobhyala jamakharcha samjatch nahi.
January maja kara aani februray volblat basa. Katkasar pahije.
Ghari jamakharcha pahije..!!
मंडळी जेजुरीला जातात, बकरा नेतात, मानेचा तुकडा कापतात.
मसाला लावून, शिजवून खातात. तुमच्या पिढ्याच्या पिढ्या मरतील.
तुमचं कधीच बरं होणार नाही. तुम्ही बकऱ्याला चारा टाकता की नाही?
हारपला बकरा, पाहून आणता की नाही? बकऱ्याला पाणी पाजता की नाही?
पाऊस आला,बकऱ्याला घरात बांधता की नाही? पोटच्या पोरासारखं वागवता
बापा अन् त्याले मसाला लावून, कापून खाता! माणसं नाही तुम्ही.
त्यांना रानडुकरं जरी म्हटलं तरीही चालेल. ज्यांच्या हातानं दुसऱ्यांच्या मानेवर
सुरी जात असेल, दुसऱ्याची मान कापून आपलं पोट भरत असेल,
या लोकांच्या अंगात माणसाचा अंश नाही..!!
Mandali jejurila jatat, bakara netat, manecha tukada kapatat.
Masala lavun, shijvun khatat. Tumchya pidhayachya pidhiya martil.
Tumcha kadhicha bara honar nahi. Tumhi bakryala chara takta ki nahi ?
harpala bakara, pahun Ananta ki nahi ? bakryala pani pajata ki nahi ?
pauas ala bakryala Gharat bandhata ki nahi? Potachya porasarkha
vagvata bap an tyale masala lavun, kapun khata ! mansa nahi tumhi,
tyana randukar jari mhantala tarihi chalel. Jyanchya hatana dusryanchya
manevar suri jaat asel, dusryanchi man kapun aapla pot bharat asel,
ya lokanchya angat mansacha ansh nahi..!!
गरिबांसाठी बायांचे दवाखाने बांधा. गोरगरिबाला औषधी द्या.
गोरगरिबाला कपडे द्या. आस्तेर पावशेर चावल द्या. गोरगरिबांवर दया करा.
मराठे, माळी, तेली, न्हावी, धोबी, चांभार, कोळी, कुंभार, लोहार, वडारी, बेलदार, कैकाडी,
गोंड, गवारी, मांग आणि महार. हे लोक का गरीबीत राहिले? त्यांना विद्या नाही आणि ज्याला
विद्या नसेल, त्याला खटाऱ्याचा बैल म्हटलं तरीही चालेल. आता तरी सुधरा. आता तरी
मुलांना शिक्षण द्या. पैसे नाही म्हणालात तर जेवणाचं ताट मोडा. हातावर भाकरी खा.
बायकोला लुगडं कमी भावाचं, कमी किंमतीचं घ्या. ईव्हायाला पाहुणचार करू नका.
पण मुलांना शाळेत घातल्याशिवाय सोडू नका. विद्या मोठं धन आहे. विद्या मोठी गोष्ट आहे.
तुम्हाला आम्हाला विद्या नाही तर मजुरी तरी लागली. पण या टायमाला मुलांना विद्या दिली
नाही, तर तुमच्या मुलाला मजुरी लागणार नाही, तर बूट पॉलिश करावी लागेल..!!
Garibansathi bayanche davakhana bandh. Gorgaribala aushadhi dya.
Gorgaribala kapde dya. Aaster pavsher chavla dya.
Gorgaribanvar dya kara. Marathe, moli, teli, nhavi, dhobhi,
chambhar,koli,kumbhar,lohar, vadari, beldar, kaikadi, gond, gavari,
mang, aani mahar. He lok ka garibat rahile ? tyana vidya nahi aani
jyala vidya nasel, tyala khatryacha bail mhantala tarihi chalel.
Ata tari sudhara. Aata tari mulana shikshan dya. Paise nahi mhanlat
tar jevancha tat moda hatavar bhakari kha. Baykola lugad kami bhavacha,
kami kimticha ghya ervhayala pahunchar karu naka.pan mulana shalet
ghatlyashivay sodu naka.vidya moth adhan aahe.vidya mothi gost ahe.
tumhala aamhala vidya nahi tar majuri tari lagali. Pan ya taymala mulana
vidya dili nhai, tar tumchya mulala majuri dili nahi, tar tumchya mulala
majuri langar nahi, tar boot polish karavi lagel..!!
हे पण पहा
- शिक्षणासाठी मराठी सुविचार
- वेळेवर आधारित कोट्स
- नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा
- हनुमान जयंतीच्या शुभेच्छा
- जन्माष्टमीच्या शुभेच्छा मराठीत
- बलिप्रतिपदाच्या शुभेच्छा मराठीत
कृपया इकडे पण लक्ष द्या
मित्रांनो आपण वरील लेखांमध्ये संत गाडगेबाबा यांचे सुविचार या लेखाच्या माध्यमातून बघितलं संत गाडगे महाराजांनी केलेले एक महत्त्वाचे कार्य आहे.
ते कार्य आहे ग्राम स्वच्छता अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती तसेच गोशाळा रुग्णालय शाळा वस्तीगृह धर्मशाळा सबर्ज वेगळ्या प्रकारचे त्यांनी उभारणी केली.
संत गाडगे महाराज हे एक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आणि गाजलेले समाज सुधारक मधून त्यांचा एक नाव हे पुढे येतं. तसेच त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहे त्यांना ग्राम स्वच्छतेचे अभियानाला सुरुवात करण्यासाठी त्यांना एक पुरस्कार देखील देण्यात आला होता.
तसंच त्यांनी ग्रामस्थांनी आपल्या गावाला स्वच्छ ठेवले पाहिजे आणि आपल्या गावाला चांगला प्रमाणात पुढे घेऊन जायला पाहिजे त्यासाठी देखील त्यांना एक पुरस्कार देण्यात आला.
मित्रांनो संत गाडगे महाराज यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती या जिल्ह्यामध्ये झाला होता तसेच नावापेक्षा गाडगे महाराज आणि संत गाडगे महाराज या नावाने अधिक त्यांना ओळखले जाऊ लागले आणि त्यांना एक वेगळी ओळख देखील मिळाली होती.
मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर आधारित या सर्व कोट्स नक्की आवडले असतील तसेच तुम्हाला या कोट्स बद्दल जर काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही जर विचारू शकतात.
शेअर बटन वर क्लिक करून तुम्ही facebook, whatsapp, instagram या सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही या कोट्स पाठवू शकतात.